जय माँ तापी

आदि गंगा सूर्यपुत्री माँ तापी देवस्थान

।।श्री तापी माई आरती मराठी ।।

।।श्री तापी माई आरती मराठी ।।

जयदेवी जयदेवी जय माये रवितनये। विंध्यांचल संभूते आरती करु विनये ।।धृ .।।

गरुडासन द्रुममूळीं तू उद्भवलीसी। 

पश्चिम जलनिधि गामिनी स्वयंभू झालीसी।। सरिता रुपे धरणीवरी अवतरली सी ।

शुक्लपक्ष सप्तमी आषाढ़मासी।।१।।जयदेवी…

तव जल कासारी श्वेतोत्पल शोभा ।

करती गुंजारव मधुकर अति आभा।

 जलचर थलचर सेवती निर्मळ तंव अंभा। नित्यानुष्ठानी दूर करी भवदंभा।।२।।जय देवी.. तापी तापी सद्भावे स्मरता   ।

 त्रैतापी तो प्राणी पावे शीतलता ।

तुझा अगाध महिमा न जाए वदिता ।

म्हणूनी बल्लाळात्मज शरणागत आता।।३।।जयदेवी जय देवी…….